“यांचं रद्दी वाचन अजून चालूच आहे वाटतं!” असे वरील शीर्षक वाचल्यावर बरेच जणांना असा प्रश्न पडल्यास नवल नाही.
“हे कुठल्या दुकानातून किराणा आणतात कुणास ठाऊक?” “आता कुठे वर्तमानपत्राच्या कागदातून किराणावाला पुडे बांधून देतॊ?” ह्या शंका मात्र बरोबर आहेत. आमच्या गावात ह्या रद्दीच्या कागदातूनच सुंदर पुडे बांधून देत. आता ते पुडे गेले. प्लास्टिकच्या पिशव्या आल्या. त्याही सोयीस्कर. सर्वांनाच सोयीस्कर असल्यामुळे अजून टिकून आहेत. तराजूही गेले.वजन-मापांबरोबर तराजूही बदलले. याचा अणि रद्दी वाचनाचा काय संबंध? असा सुज्ञ वाचकांना प्रश्न पडला असेल तर चूक नाही.
मराठीमित्राच्या एका वाचकाने टॉक्सिसिटी, टॉक्सिन यांना मराठी शब्द काय असे विचारले होते. मला महित असलेले शब्द सांगितले पण त्याचे समधान झाले नाही. मग श्याम, नंदू यांच्याशी चर्चा करून– हा शब्द फार मोठा झाला-त्यांना विचारले . दोघांनी ’विषारीपणा’ हा शब्द सांगितला. आणि तोच बरोबरही आहे. मधे बरेच दिवस गेले. माझ्या डोक्यातून तो प्रश्न आणि त्या वाचकाचे मी सांगितलेल्या शब्दांना “हे आम्हाला माहित आहेत,अणि विष म्हटले की साप, विंचू यांचे विष असे समोर येते. पण टॉक्सिसिटी/ टॉक्सिन यांना मराठीत एका शब्दात/किंवा दोन शब्दात तसा अर्थ होईल असे शब्द सांगा” हे काही माझ्या डोक्यातून जात नव्हते.
दोन तीन दिवसांनी, सर्पदंश, विंचू चावल्यावर कोणते आयुर्वेदिक उपचार करावेत यासंबंधी एक लेख वचण्यात आला. लेख नामंकित वैद्यांचा होता. त्यात ओघात ’शरीरातील सप्तधातूंमध्ये असलेली विषाक्तता…’ आणि पुढे ’शरीराने स्वत:च तयार केलेले विष…. याला आयुर्वेदात “आम” असे म्हणतात’ असे उल्लेख आले. ते वाचल्यावर आर्किमिडिजला जेव्हढा आनंद झाला असेल तेव्ह्ढाच आनंद मलाही झाला!
टॉक्सिसिटी आणि टॉक्सिनला मराठीत प्रतिशब्द सापडले! हे शब्द आम्ही त्या वाचकाला ताबडतोब कळविले. माझ्या इतकाच त्यालाही आनंद होईल असे मला वाटत होते. प्रश्न विचारताना आणि नंतर पुन्हा लिहिताना चार चार पाच पाच ओळींची पत्रे लिहिणाऱ्या त्या वाचकाने हे दोन नेमके योग्य शब्द मिळाल्यावर फक्त एका शब्दाचे उत्तर पाठवले. हरकत नाही. उत्तर आले हेही नसे थोडके! मला सांगायला आनंद वाटतो की हे मला माझ्या रद्दी-वाचनातूनच मिळाले! इथे अमेरिकेत कुठले मराठी वर्तमानपत्र? पुण्याहून आणलेल्या इस्त्रीच्या कपड्यात असलेल्या एका वर्तमानपत्राच्या चतकोरात हा मजकूर होता! बोला आता.
रद्दी वाचनीय असते का नाही हा प्रश्न निराळा पण मी आणि माझ्यासारखे बरेचजण ती वाचतात हे मात्र खरे.
english word is simple while marathi word is difficult to pronounce!
टॉक्सिसिटी/ टॉक्सिन *** विषाक्तता/ आम” (jodi julat nahi)
once we talked about Na Ci Phadke’s essay/ short story Harawali pun Sapadli,
writer was searching for Key he did not got it but his memory got revived because of few other things he came across while searching the Key.
a small Raddi paper gave u a Great satisfaction.
that’s the gain, your heart will be cosier.
this is a beauty of the life.
Shrikant