Monthly Archives: August 2014

कधी भेटशील

माझे लग्न होउन एकोणीस वर्षे झाली. संसार सुखात चाललाय.बरं, मी काही पत्रकार नाही.शोधपत्रकारिता तर माझा प्रांतही नाही. कुणाच्या प्रेमात पडले आहे,पडायचे आहे; कोणी मित्र, सखा जिवलग शोधायचा आहे असेही नाही. असले काहीही कारण नाही. मला तसा मित्र माझा जिवलग मिळालाही आहे माझा नवरा. मग अजूनही रोज मी वर्तमानपत्रातल्या ‘त्या’ जाहिराती का पहात असते? तो एक माझा जुना छंद आहे. अशा ‘वैयक्तिक’ जाहिरातीतून सामान्य माणसातील दुर्दम्य इच्छा, आशा, स्वप्ने आणि सोशिकतेचे, प्रतिक्षेचे चित्र दिसत असते. माणूस आशेच्या बळावर एखाद्याची वाट पहात असतो की आपले स्वप्न आज ना उद्या पुरे होईल या विश्वासापोटी अशा ‘व्यक्तिगत’ जाहिराती देत असतो.याचे रोज नवीन उत्तर शोधत असते. अनेकांच्या रोजच्या आयुष्यातील नाट्य त्या जाहिरातीतून अनुभवत असते.

माझ्या ओळखीच्या हिला किंवा त्याला ही जाहिरात दाखवली पाहिजे असे वाटते. त्या.ना पोस्ट बॉक्स नंबर देते. पहा ,तिथे उत्तर पाठवा असे कधी त्यांच्या पाठीमागे लागते. पण हे क्वचितच. केवळ कुतुहल आणि त्या ‘जाहिरातींच्या’ हृदयात काय चालले असेल ह्याचा अंदाज बांधणे इतकाच खेळ त्यामागे असतो. पण रोज त्या वाचत असते आणि थोडा वेळ घालवते.

परवा मात्र एका जाहिरातीपाशी थांबले.पुन्हा पुन्हा मी ती वाचत होते. “हे खरे असेल?”, असा विचार वारंवार येत होता. जाहिरातीतील आयर्व्हिंग काय म्हणत होता? “हेन्रीएटा, तुला आठवतय ?आपण १९३८ साली “कॅम्प टर्मिमेंट”मध्ये होतो. तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडलो. अजूनही मी तुला विसरलो नाही. मला फोन कर. आयर्व्हिंग…”त्याने फोन नंबरही दिला होता. सहसा अशा जाहिरातीत बॉक्स नंबर असतो. मला प्रथम ही एक कुणाची तरी चेष्टा, लबाडी असावी किंवा एकूणच ती जाहिरात फसवी आहे असे वाटले.पण दिवसभर आयर्व्हिंगच्या त्या जाहिरातीने माझा पिच्छा सोडला नाही.

“अशा जाहिराती खर्चिक आसतात.उगीच मजेखातर कोण पैसा खर्च करेल?आणि फसवणूक असेल हे तरी कशावरून? अशा उलट सुलट विचारात रात्र गेली. सकाळी ठरवले. खरे काय ते पाहायचे. आपणच फोन करू या असे म्हणत धैर्य एकवटून मी त्या नंबरवर फोन लावला.

एका पुरुषाचा परिपक्व आवाज पलीक्डून ऐकल्यावर लगेच वाटले, सगळे खरे आहे. थोता.ड नाही. त्या माणसाचा आवाज ऐकल्यावर आणि बोलण्याची पद्धत पाहूनच, खरे काय ते सांगून टाकावे असे वाटले. एका क्षणापुरती तरी त्याची अपेक्षा का वाढवायची? “अं… म्हणजे असं आहे…मी हेन्रिएटा नाही. पण तुमची जाहिरात वाचली आणि राहवले नाही. प्रथम मला कुणीतरी कुणाला फसवू पाहतेय असे वाटले. पण तुमचा आवाज ऐकलयावर माझे मत बदलले.तुमची हरकत नसेल तर आणि इच्छा असेल तरच, काय घडले ते सांगाल का?” अतिशय शांतपणे तो आपली कहपडलो. पण तिच्या आइ वडिलाना हे पसंत पडले नाही. इतक्या लहान वयात लग्ना बेडीत तिने अडकून पडू नये असे त्या.ना वाटत होते. त्या.नी तिला दूर युरोपात नातेवाईकांकडे पाठवले. आमची ताटातूट झाली. ती तिकडेच बरीच वर्षे रहात होती. तिथे तिने लग्नही केले. माझा प्रेमभंग झाला होत.

काळाच्या प्रवाहात माझेही लग्न झाले. आमचा संसार नीट नेटका चालला होता. माझी बायको चांगली होती. ज्या उत्कटतेने मी हेन्रिएटावर प्रेम केले तसे प्रेम काही मी बायकोवर करू शकलो नाही. पण आमचा संसार चारचौघांसारखा आनंदाचा होता. माझी पत्नी तीन चार वर्षांपूर्वी वारली. मी एकटा,एकाकी पडलो. हेन्रिएटाची फार आठवण होवू लागली. पण असेही वाटयचे ती अजून असेल का? आणि असली तर अजून तिचा संसारही चालू असेल. तीही एकटीच असेल असे कशावरून? पुन्हा तिची आणि माझी भेट होईल का? आणि ती कुठे असेल? असे माझ्या मनात सारखे येते. माझा मूर्खपणाही असेल पण हेन्रिएटा भेटावी ही तर तीव्र इच्छा आहे. काय होईल ते होवो. प्रयत्न तरी करून पहावा म्हणून मी अखेर जाहिरात दिली. हेन्रिएटा जाहिरात वाचेल अशी वेडी आशा बाळगून आहे. किंवा तिच्या ओळखीच्या कुणीतरी जाहिरात पाहिली तरी तिला कळेल. शक्यता फार कमी आहे. एक प्रयत्न केलाय. बघू या, कधी भेटेल ती.”

अशा असफळ प्रेमकथा आणखीही असतील. प्रेमभंगाचे, विरहाचे दु:ख हृदयात जपून ठेवत किती तरी हृदये अमर आशेवर वाट बघत दिवस काढत असतील. असे बरेच काही माझ्या मनात घोळत होते. आशेची अमरवेल हृदयात जपत सत्तर वर्षाचा आयर्व्हिंग एकाकी दिवस काढतोय हे माझ्या मनात सारखे यायचे. त्याच्याविषयी आस्था वाटू लागली.

आयर्व्हिंगचा नंबर माझ्यापाशी होताच. मी महिन्याभरात एक डोनद त्याच्याशी बोलले. पण बिचाऱ्याला अजूनही हेन्रिएटाचा फोन आला नव्हता. अशी दोन वर्षे गेली.

मी न्यूयॉर्कच्या सबवेतून जात होते. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रातील ‘व्यक्तिगत’ स्तंभातील जाहिराती वाचण्यात गुंग होते. माझ्या जवळून कोणी हसल्याचा आवाज आला. शेजारीच बसलेल्या बाई हसत म्हणाल्या,”काय स्वत:साठी स्थळं पाहतेस वाटतं?” मी एकदम हसले,”तसं काही नाही. माझी ही सवय आहे. नेहमी वाचते ह्या.” त्म्ही कधी वाचता की नाही?” “नाही, अजिबात नाही. काही जाहिराती तर फार रडवेल्या असतात. मला तसले काही आवडत नाही. त्याच गोष्टीविषयी अनेकांची निराळी दृष्टी असते.खरं की नाही?” मला बाईंचे म्हणणेथोडे पटले. खरे आहे तुम्ही म्हणता ते.”मी म्हणाले आणि मी दोन अडीच वर्षंपूर्वी ऐकलेली, माहित असलेली आयर्व्हिंग आणि हेन्रिएटाची हळूवार प्रेम कहाणी सांगू लागले.

त्यांची प्रेमकथा, आयर्व्हिंगची हेन्रिएटाला भेटण्याची ‘भेटीलागी जीवा’ तळमळ ती बाईसुद्धा मंत्रमुग्ध होउन ऐकत होती. सांगून झाल्यावर मी म्हणाले,” आयर्व्हिंगला हेन्रिएटा भेटली असा गोड शेवट सांगायला मी फार आतुर आहे. पण हेन्रिएटा काही त्याला अजून भेटली नाही.” असे मी खिन्नपणे म्हणाले. पुढे मीच म्ह्णाले,”मला वाटते हेन्रिएटा आपल्या संसारात गुंतली असेल.किंवा ती या जगात असेल की नाही याची खात्री कोण देणार/? किंवा ती जाहिराती पहातही नसेल. काय सांगावे! ती बाई म्हणाली,”तुझा तिसरा अंदाजच खरा आहे. माझ्यावर विश्वास ठेव,”ती बाई माझा हात थोपटत म्हणत पुढे हळूच तिने विचारले,”आयर्व्हिंगचा नंबर देतेस का मला?”